Kesher Farming: केशर शेती कशी करावी ?

Kesher Farming: केशर शेती कशी करावी ? : केशर देशभरातील विविध ठिकाणी पिकवण्याचे प्रयोग सुरू आहेत. तोळ्याच्या मापात विकला जाणारा केशर, प्रति किलो अडीच ते तीन लाख रुपये दराने विकले जातात। त्यामुळे सर्वाधिक दर मिळणाऱ्या केशर हे मसाल्यातील सर्वात महाग पीक आहे. आज आम्ही आपल्याला केशर पिकाविषयी माहिती सांगणार आहोत. (Saffron)

भारतातील जम्मू आणि काश्मीर येथे समुद्रसपाटीपासून सुमारे १६०० मीटर उंचीवर केशराची लागवड केली जाते. या वनस्पतीच्या फुलातील जायंगाच्या टोकाकडील धागा सारखा भाग वाळवून केशर मिळवतात. केशर हे लहान आणि बहुवर्षी फुलझाड असून, त्याला जमिनीत खवलेयुक्त घनकंद असतो. त्यापासून जमिनीवर रेखाकृती निमूर्ती होत जाणारी गौतम सारखी वारीत पाण येतात. फुले जांभळी एकेकटी आणि पानांसारखी भासणारी असतात. त्यात पिवळे पराकोष असतात, अंडाशय तीन कप्प्यांचे असून, कुक्षी केशरी रंगाचे असते. कुक्षीचे भाग दोन ते अडीच सेंटीमीटर लांबीच्या देठाणे वनस्पतीशी जोडलेले असतात. हेच केशराचे तंतू असून ते वाळवून केशर मिळवले जाते.

Kesher Farming: केशर शेती कशी करावी ?
Saffron

केशर महाग का असते ? – Why is saffron expensive?

केशर मिळवण्यासाठी फुलातील कुक्षीच्या ठोक्या अगदी सकाळी उोडतात आणि ती उष्णतेने किंवा उन्हात वाढवतात. सुमारे एक लाख 70 हजार फुलांपासून एक किलोग्रॅम वाळलेले केशर मिळते, यामुळे ते महाग असते.

केशर चा दर्जा कसा ओळखावा ? – How to identify the quality of saffron?

वाळवलेल्या केशराच्या दर्जा ठरवण्यासाठी ते पाण्यात टाकतात, तळाशी बसलेले केशर चांगल्या प्रतीचे तर पाण्यावर तरंगणारे केशर हलक्या प्रतीचे मानले जाते. असे तरंगणारे केशर पुन्हा वाळून जोडतात आणि त्याचा दर्जा ठरवण्यासाठी ते पुन्हा पाण्यात टाकतात.

केशर किती प्रकारच आहे ? – How many types of saffron?

भारतातील केशराचे तीन प्रकार आहेत- शाही केसर, मोगरा केशर आणि लांजा केशर. “शाही केशर उच्च प्रतीचे असते तर लांजा केशर हलक्या प्रतीचे असते. केशराचे आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने त्याला अधिक महत्त्व आहे.

केशरचे फायदे ? – Benefits of saffron?

  1. केशर सुवासिक उत्तेजक, शक्तिवर्धक आणि रचक असते.
  2. केशर श्वसन नलिका दाह घशाचे विकार आणि त्वचेच्या विकारांवर गुणकारी असल्याचा आयुर्वेदात उल्लेख आढळतो.
  3. खरचटणे , साध्या जखमा संधिवात इत्यादींवर केशटाचा लेप लावतात.
  4. केशराचा प्रमुख उपयोग मिठाई तसेच इतर खाद्यपदार्थांना स्वाद आणि रंग आणण्यास करतात.

केशरची किम्मत किती ? – How much is the price of saffron?

तोळ्याच्या मापात विकले जाणारे केशर ” प्रति किलो अडीच ते तीन लाख रुपये” दराने विकले जाते. त्यामुळे सर्वाधिक दर मिळणारे केशर हे मसाल्यातील सर्वात महागडी पीक आहे.

Kesher Farming: केशर शेती कशी करावी ?
Saffron

केशर ची शेती कशी करावी ? – How to cultivate saffron?

केशरच्या लागवडीसाठी दहा बोल बियांचा किंवा कंदांचा वापर केला जातो. केशराची लागवड समुद्रसपाटीपासून पंधराशे ते अडीच हजार मीटर उंचीवर केली जाते. काश्मीरमध्ये देखील याच उंचीवर ही लागवड होत असते. केशर शेतीसाठी थोडेफार ऊन आणि शुष्क कोरडी थंडी म्हणजेच साधारण दहा अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आवश्यक असते. केशर चे उत्पादनासाठी जमीन निवडताना ती रेतीदायक वालिकामय नाही “तर” चिकन मातीयुक्त असावी. असे असले तरी पाण्याचा निचरा होणे अत्यंत आवश्यक असून, एकाच ठिकाणी पाणी जास्त वेळ जमा राहिल्यास केशराचे कंद खराब होतात, आणि पिकाचे नुकसान होते. त्यामुळे जमीन निवडताना ती पाणी साचून राहणार नाही असेच निवडणे गरजेचे आहे.

केशराचे बियाणे लावण्या अगोदर शेतीचे चांगल्या प्रकारे नागरट करावी. यानंतर रोटर ने माती भुसभुशीत करून त्यात एकरी 20 टन शेणखत मिसळून घ्यावे. सोबत ९० किलोग्राम नायट्रोजन, 60 किलोग्रॅम फॉस्फरस आणि पोटाश  प्रत्येक हेक्टर प्रमाणे शेतात टाकावे. यामुळे केशर चे पीक चांगल्या प्रकारे येते. केशरची लागवड भौगोलिक वातावरणानुसार करावी लागते. उंच पहाडी भागात केशरची लागवड, जुलै ते ऑगस्ट निर्माण केली जाते.  मैदानी क्षेत्र फेब्रुवारी ते मार्च महिन्यात लागवड केली जाते. केशरचे बब लावताना सहा ते सात सेंटीमीटर चा खड्डा करावा आणि त्या दोन कंद टाकावे. त्यानंतर दहा सेंटिमीटर च्या अंतरावर दुसरा खड्डा करावा, त्यामुळे कंद चांगल्या पद्धतीने पसरतात आणि उत्पादन चांगले येते. आणि बाजारातही अशा केसराला चांगला दर मिळतो. 

ArticleBy.- VikramMarket.


ड्रोन दीदी योजना काय आहे? – ‘Namo Drone Didi’ scheme

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top